ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६३ (रोगनाशनाचे पालुपदसूक्त)
ऋषी - वित्रि काश्यप : देवता - यक्ष्मनाश-रोगनाश : छंद - अनुष्टुभ्
अ॒क्षीभ्यां॑ ते॒ नासि॑काभ्यां॒ कर्णा॑भ्यां॒ छुबु॑का॒दधि॑ ।
यक्ष्मं॑ शीर्ष॒ण्यं म॒स्तिष्का॑ज् जि॒ह्वाया॒ वि वृ॑हामि ते ॥ १॥
यक्ष्मं॑ शीर्ष॒ण्यं म॒स्तिष्का॑ज् जि॒ह्वाया॒ वि वृ॑हामि ते ॥ १॥
अक्षीभ्यां ते नासिकाभ्यां कर्णाभ्यां चुबुकात् अधि
यक्ष्मं शीर्षण्यं मस्तिष्कात् जिह्वायाः वि वृहामि ते ॥ १ ॥
यक्ष्मं शीर्षण्यं मस्तिष्कात् जिह्वायाः वि वृहामि ते ॥ १ ॥
तुझे दोन्ही नेत्र आणि तसेंच नाक, कान आणि हनुवटी (इत्यादि)
शरीरावयवांच्या ठिकाणी जो कांहि यक्ष्मरोग (म्हणजे दुर्धर व्याधि) जडलेला
असेल, किंवा तुझे मस्तक, त्यांतील मेन्दू आणि जिव्हा ह्यांच्यामध्ये जो
कांही व्याधि असेल, त्याचा मी समूळ उच्छेद करून टाकतो १.
ग्री॒वाभ्य॑स्त उ॒ष्णिहा॑भ्यः॒ कीक॑साभ्यो अनू॒क्यात् ।
यक्ष्मं॑ दोष॒ण्य१ं अंसा॑भ्यां बा॒हुभ्यां॒ वि वृ॑हामि ते ॥ २ ॥
यक्ष्मं॑ दोष॒ण्य१ं अंसा॑भ्यां बा॒हुभ्यां॒ वि वृ॑हामि ते ॥ २ ॥
ग्रीवाभ्यः ते उष्णिहाभ्यः कीकसाभ्यः अनूक्यात्
यक्ष्मं दोषण्यं अंसाभ्यां बाहु-भ्यां वि वृहामि ते ॥ २ ॥
यक्ष्मं दोषण्यं अंसाभ्यां बाहु-भ्यां वि वृहामि ते ॥ २ ॥
तुझा गळा, तसेंच मानेचा स्नायु, छातीची लवचिक हाडे, पाठीचा कणा, त्याच्या
आंतील भाग, त्याचप्रमाणे स्कन्ध (म्हणजे खांदे) त्यांचा मांसल भाग म्हणजे
भुजवटा, तसेच त्या खांद्यांचा पृष्टभाग आणि भुजदण्ड ह्या सर्वांच्यामधील
सर्व व्याधींचा पार नाश करून टाकतो २.
आ॒न्त्रेभ्य॑स्ते॒ गुदा॑भ्यो वनि॒ष्ठोर्हृद॑या॒दधि॑ ।
यक्ष्मं॒ मत॑स्नाभ्यां य॒क्नः प्ला॒शिभ्यो॒ वि वृ॑हामि ते ॥ ३ ॥
यक्ष्मं॒ मत॑स्नाभ्यां य॒क्नः प्ला॒शिभ्यो॒ वि वृ॑हामि ते ॥ ३ ॥
आन्त्रेभ्यः ते गुदाभ्यः वनिष्ठोः हृदयात् अधि
यक्ष्मं मतस्नाभ्यां यक्नः प्लाशि-भ्यः वि वृहामि ते ॥ ३ ॥
यक्ष्मं मतस्नाभ्यां यक्नः प्लाशि-भ्यः वि वृहामि ते ॥ ३ ॥
तुझ्या पोटांतील आंतडी, गुह्यस्थान, स्थूलान्त्र, हृदयप्रदेश, दोन्ही
मूत्रपिण्ड, तसेंच बृहत् यकृत् व आंतड्यांजवळील प्लीहादिक मांसपिण्ड
ह्यांच्यातील यच्चयावत् रोगांचा अगदी नि:पात करून टाकतों ३.
ऊ॒रुभ्यां॑ ते अष्ठी॒वद्भ्यां॒ पार्ष्णि॑भ्यां॒ प्रप॑दाभ्याम् ।
यक्ष्मं॒ श्रोणि॑भ्यां॒ भास॑दा॒द्भंस॑सो॒ वि वृ॑हामि ते ॥ ४ ॥
यक्ष्मं॒ श्रोणि॑भ्यां॒ भास॑दा॒द्भंस॑सो॒ वि वृ॑हामि ते ॥ ४ ॥
ऊरु-भ्यां ते अष्ठीवत्-भ्यां पार्ष्णि-भ्यां प्र-पदाभ्यां
यक्ष्मं श्रोणि-भ्य्ं भासदात् भंससः वि वृहामि ते ॥ ४ ॥
यक्ष्मं श्रोणि-भ्य्ं भासदात् भंससः वि वृहामि ते ॥ ४ ॥
त्याचप्रमाणे तुझ्या दोनी मांड्या, गुडघ्यांच्या वाट्या, टांचा, आणि पावले
ह्यांना जडलेला कोणाताहि रोग; तसेंच नितंबभाग, कटिप्रदेश आणि जांगाड
ह्यांच्याहिमध्ये भिनलेले एकंदर व्याधि अगदी होते की नव्हते असे करून
टाकतो ४.
मेह॑नाद्वनं॒कर॑णा॒ल् लोम॑भ्यस्ते न॒खेभ्यः॑ ।
यक्ष्मं॒ सर्व॑स्मादा॒त्मन॒स्तं इ॒दं वि वृ॑हामि ते ॥ ५ ॥
यक्ष्मं॒ सर्व॑स्मादा॒त्मन॒स्तं इ॒दं वि वृ॑हामि ते ॥ ५ ॥
मेहनात् वनम्-करणात् लोम-भ्यः ते नखेभ्यः
यक्ष्मं सर्वस्मात् आत्मनः तं इदं वि वृहामि ते ॥ ५ ॥
यक्ष्मं सर्वस्मात् आत्मनः तं इदं वि वृहामि ते ॥ ५ ॥
तद्वतच (मेहन म्हणजे) मूत्रमार्ग आणि बस्तिभाग तसाच केशयुक्त भाग आणि नखे
इत्यादि सर्व अवयवांमध्ये जरी हा रोग असेल, तरी त्याला अगदी पार नष्ट करून
टाकतो ५.
अङ्गा॑द्-अङ्गा॒ल्लोम्नो॑-लोम्नो जा॒तं पर्व॑णि-पर्वणि ।
यक्ष्मं॒ सर्व॑स्मादा॒त्मन॒स्तं इ॒दं वि वृ॑हामि ते ॥ ६ ॥
यक्ष्मं॒ सर्व॑स्मादा॒त्मन॒स्तं इ॒दं वि वृ॑हामि ते ॥ ६ ॥
अङ्गात्-अङ्गात् लोम्नः-लोम्नः जातं पर्वणि-पर्वणि
यक्ष्मं सर्वस्मात् आत्मनः तं इदं वि वृहामि ते ॥ ६ ॥
यक्ष्मं सर्वस्मात् आत्मनः तं इदं वि वृहामि ते ॥ ६ ॥
प्रत्येक अवयव अवयवांत, केसा-केसांत, सांध्यान् सांध्यात जो जो रोग असेल,
त्या त्या सर्व व्याधींचे शरीरांतून पहा समूळ उच्चाटन करून टाकतो ६.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १६४ (दुःस्वप्ननाशनसूक्त)
ऋषी - प्रचेतस् आंगिरस : देवता - दुःस्वप्ननाशन :
छंद - ३ - त्रिष्टुभ्; ५ - पंक्ति; अवविष्ट - अनुष्टुभ्
छंद - ३ - त्रिष्टुभ्; ५ - पंक्ति; अवविष्ट - अनुष्टुभ्
अपे॑हि मनसस्प॒तेऽ॑प क्राम प॒रश्च॑र ।
प॒रो निरृ॑त्या॒ आ च॑क्ष्व बहु॒धा जीव॑तो॒ मनः॑ ॥ १॥
प॒रो निरृ॑त्या॒ आ च॑क्ष्व बहु॒धा जीव॑तो॒ मनः॑ ॥ १॥
अप इहि मनसः पते अप क्राम परः चर
परः निः-ऋत्यै आ चक्ष्व बहुधा जीवतः मनः ॥ १ ॥
परः निः-ऋत्यै आ चक्ष्व बहुधा जीवतः मनः ॥ १ ॥
मनाच्या चालका, जा बाबा, दूर जा; बाजूला सर, अगदी लांब चालता हो; आणि
तेथूनच दृष्टि फेंकून माझ्या अवदशेला सांग की, जिवंत मनुष्याच्या मनाचे
ढंग नाना प्रकारचे असणारच (आणि म्हणूनच तुझें फांवते) १.
भ॒द्रं वै वरं॑ वृणते भ॒द्रं यु॑ञ्जन्ति॒ दक्षि॑णम् ।
भ॒द्रं वै॑वस्व॒ते चक्षु॑र्बहु॒त्रा जीव॑तो॒ मनः॑ ॥ २ ॥
भ॒द्रं वै॑वस्व॒ते चक्षु॑र्बहु॒त्रा जीव॑तो॒ मनः॑ ॥ २ ॥
भद्रं वै वरं वृणते भद्रं युजन्ति दक्षिणं
भद्रं वैवस्वते चक्षुः बहु-त्रा जीवतः मनः ॥ २ ॥
भद्रं वैवस्वते चक्षुः बहु-त्रा जीवतः मनः ॥ २ ॥
त्याला (मनुष्याला) जे कांही पाहिजे असते ते उत्तमच हवे असते; जी जी
वस्त्सु योग्य म्हणजे त्याच्या मनाजोगती दिसेल, तीच तो आपलीशी करतो. मग
त्याच्यावर यमाची कां वक्रदृष्टि असेना. पण ती कल्याणप्रद व्हावी असा
मात्र त्याचा प्रयत्न असतो. ह्याप्रमाणे जिवंत मनुष्याचे मन सर्वत्र
धांवतच असते, (सर्व इच्छित वस्तूंच्या ठिकाणी ते खिळून राहते २.
यदा॒शसा॑ निः॒शसा॑भि॒शसो॑पारि॒म जाग्र॑तो॒ यत् स्व॒पन्तः॑ ।
अ॒ग्निर्विश्वा॒न्यप॑ दुष्कृ॒तान्यजु॑ष्टान्या॒रे अ॒स्मद्द॑धातु ॥ ३ ॥
अ॒ग्निर्विश्वा॒न्यप॑ दुष्कृ॒तान्यजु॑ष्टान्या॒रे अ॒स्मद्द॑धातु ॥ ३ ॥
यत् आशसा निः-शसा अभि-शसा उप-आरिम जाग्रतः यत् स्वपन्तः
अग्निः विश्वानि अप दुः-कृतानि अजुष्टानि आरे अस्मत् दाधातु ॥ ३ ॥
अग्निः विश्वानि अप दुः-कृतानि अजुष्टानि आरे अस्मत् दाधातु ॥ ३ ॥
त्याच्या आकांक्षा, त्याच्या निराशा, त्याच्या आशेवर होनारे आघात ह्या
सर्वांचा त्याला अनुभव येतोच. (म्हणून प्रार्थना हीच कीं) आम्ही जागे असूं
किंवा निद्रित असूं; कोणात्याहि अवस्थेंत आमच्याकडून जें कांही घाणेरडे
किंवा दुष्कृत्य घडले असेल, त्याचा दोष अग्नि हा आमच्यापासून दूर करो ३.
यदि॑न्द्र ब्रह्मणस्पतेऽभिद्रो॒हं चरा॑मसि ।
प्रचे॑ता न आङ्गिर॒सो द्वि॑ष॒तां पा॒त्वंह॑सः ॥ ४ ॥
प्रचे॑ता न आङ्गिर॒सो द्वि॑ष॒तां पा॒त्वंह॑सः ॥ ४ ॥
यत् इन्द्र ब्रह्मणः पते अभि-द्रोहं चरामसि
प्र-चेताः नः आङ्गिरसः द्विषतां पातु अंहसः ॥ ४ ॥
प्र-चेताः नः आङ्गिरसः द्विषतां पातु अंहसः ॥ ४ ॥
हे इन्द्रा, हे ब्रह्मणस्पति, जेव्हां जेव्हां आम्ही मनामध्ये द्वेषबुध्दि
बाळगून वर्तन करूं, आणि जे कांही पापकर्म आमच्या हातून होईल, तेव्हां
महाज्ञानी जो आंगिरस तो द्वेष्ट्यांच्या आघातापासून आमचे मुक्तता करो ४.
अजै॑ष्मा॒द्यास॑नाम॒ चाभू॒माना॑गसो व॒यम् ।
जा॒ग्र॒त्स्व॒प्नः सं॑क॒ल्पः पा॒पो यं द्वि॒ष्मस्तं स ऋ॑च्छतु॒ यो नो॒ द्वेष्टि॒ तं ऋ॑च्छतु ॥ ५ ॥
जा॒ग्र॒त्स्व॒प्नः सं॑क॒ल्पः पा॒पो यं द्वि॒ष्मस्तं स ऋ॑च्छतु॒ यो नो॒ द्वेष्टि॒ तं ऋ॑च्छतु ॥ ५ ॥
अजैष्म अद्य असनाम च अभूम अनागसः वयं
जाग्रत्-स्वप्नः सम्-कल्पः पापः यं द्विष्मः तं सः ऋच्चतु यः नः द्वेष्टि तं ऋच्चतु ॥ ५ ॥
जाग्रत्-स्वप्नः सम्-कल्पः पापः यं द्विष्मः तं सः ऋच्चतु यः नः द्वेष्टि तं ऋच्चतु ॥ ५ ॥
पहा, आज आम्ही वाणी तर जिंकली; आमचे उद्दिष्ट आम्ही साध्य केले आणि आमचा
निरपराधपणा सिध्द केला. तथापि जागेपणी किंवा झोपेमध्ये जी कांही
दुर्वास्ना आमच्या मनांत छपून राहिली असेल, ती पातकी वासना आमच्या
शत्रूकडे जावो, आमचा जे द्वेष करीत असतील, त्यांच्याकडे जावो (तिचा
दुष्परिणाम) त्यांना भोगावा लातो ५.